सारोळा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर : पुणे – सातारा महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच.शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास
हॉटेल अमृता समोर झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत
राहुल नथुजी भुरे (वय ३१ वर्षे, सध्या रा. मदर्स रेसिपी कंपनी, मूळ राहणार ता. पवनी जि. भंडारा) यांचा जागीच मृत्यू झाला. राहुल मदर्स रेसिपी कंपनी मध्ये कामाला होता. रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.झालेल्या अपघातामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा होत वाहनाची तुडुंब गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व राजगड पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत सदरील गर्दी बाजूला करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदननसाठी भोर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.सदरील घटनेचा तपास राजगड पोलीस करीत आहेत.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space