निगडे येथील मृत पावलेल्या चारही शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना मिळाली आर्थिक मदत.
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सारोळा (भोर): भोर तालुक्यातील मौजे निगडे गावातील शेतकरी अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानेश्वर जाधव, विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे हे दि. १५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वा. च्या सुमारास शेती कामासाठी नदीपात्रात विदयुत मोटर टाकत असताना या चारही शेतकऱ्यांना विजेच्या झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेनंतर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी कुटुंबीयांची भेट घेत, झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मृत पावलेल्या चारही शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यात येईल असा धीर दिला होता.
आज सोमवार दि.८ रोजी सदरील कुटुंबीयांना १ लक्ष रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देत पुढे स्व.गोपीनाथराव मुंडे शेतकरी कृषी अपघात विम्यातून रक्कम रू.२ लक्ष मदत लवकर पाठपुरावा करत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्यांच्या कुटूंबियांना आधार दिला. या वेळी भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमन शंकरनाना मालुसरे हे उपस्थित होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space