नमस्कार शिव संवाद न्युज मध्ये आपले सहर्ष स्वागत. येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या पाहायला मिळतील.तसेच बातम्या व जाहिराती साठी संपर्क मुख्य संपादक: तुषार दत्तात्रय सणस 9763014812 समन्वयक: मंगेश राजेंद्र पवार 9834245095. , हिरडस मावळात सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन –
09/01/2024

जनतेच्या मनातले परखड व निर्भिड व्यासपीठ

हिरडस मावळात सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निगुडघर (भोर) : भोर तालुक्यातील हिरडस मावळातील ३७ गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन सकल मराठा समाज भोर तालुक्याचे अध्यक्ष संजय भेलके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.(७) रोजी करण्यात आले.

हिरडस मावळ भागातील शेतकरी व नागरिकांना कुणबी दाखले काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे २००१ साली पंचायत समिती भोर येथील आगीत जळाल्यामुळे मराठा बांधव शेतकऱ्यांना कुणबी दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी हिरडस मावळातील मराठा समाजाच्या वतीने निगुडघर येथील झालेल्या बैठकीत एकाच दिवशी शाखा उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्रातील भोर तालुक्यात प्रथमच हिरडस मावळ भागात एकाच दिवशी सकल मराठा समाजाच्या ३७ शाखांचे उद्घाटन करण्यात आल्याने सकल मराठा समाज बांधवांचे कौतुक होत आहे.याचा आदर्श महाराष्टातील मराठा समाज बांधवांनी घ्यायला हवा असे मत मराठा बांधवांनी व्यक्त केले.

तसेच आपापल्या गावातील मराठा समाज बांधवांना होणाऱ्या अडचणी कशा सोडविल्या जातील यासाठी प्रत्येक गावातून पाच मराठा योद्धांची निवड करण्यात आली.त्यांच्या हस्ते शाखा उद्घाटन प्रसंगी श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

या सकल मराठा समाजाच्या शाखांचे उद्घाटन हिरडस मावळातील मध्यवर्ती ठिकाण मौजे निगुडघर येथून सुरुवात करण्यात आली आणि आपटी येथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या सकल मराठा समाजाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष संजय भेलके,उपाध्यक्ष भालचंद्र जगताप, सचिव सारंग शेटे,कार्याध्यक्ष सोमनाथ ढवळे,खजिनदार दिपक शेटे,तसेच संदीप शेटे,कुणाल धुमाळ,युवराज जेधे,महेश शेटे,सोमनाथ धुमाळ,बाळासाहेब शेटे,सुनील थोपटे,सुनील चोरघे,नितीन कुडले,बाळासाहेब खुटवड,संदीप खाटपे,मानसिंग बाबा धुमाळ, गोळे सर,दिपक शिवतरे ,एकनाथ रोमन यांसह हिरडस मावळ पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,तरुण वर्ग तसेच महिला वर्ग आणि सकल मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

error: Content is protected !!