२० वर्षांपूर्वीचे ‘ते’ वर्ग मित्र परस्परांना भेटले आणि डोळ्यासमोर उभा राहिला भुतकाळ !
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सारोळा : तब्बल २० वर्षांनंतर ‘ते’ वर्ग मित्र एकमेकांना भेटले. नोकरी आणि अन्य कामामुळे एकमेकांना भेटायला त्यांना वेळ मिळत नव्हता. मात्र स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं ‘ते’ सारे एकत्र जमले आणि भूतकाळातल्या आठवणींचा चित्रपट ‘त्या’ सर्वांच्या मन रुपी डोळ्यांसमोर उभा राहिला.
भोर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल न्हावी ,एसएससी बॅच २००३ चा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम २४ डिसेंबर २०२३ रोजी हॉटेल सयाजी, सारोळा या ठिकाणी संपन्न झाला.
शैक्षणिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, प्रशासकीय सेवा, शेती, उद्योजक,अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व जुने मित्र यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
तब्बल २० वर्षांनी आलेल्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनले आदर्श गुरुवर्य तारू सर, वालगुडे सर ,कदम सर , रोकडे सर , शेवाळे सर .याच गुरुवर्यांच्या हस्ते गणेश पूजन करून २० वर्षा पूर्वी बंद केलेल्या सुंदर क्षणाच्या आठवणीच्या पुस्तकाला वाचायला सुरुवात झाली ती पुन्हा विद्यार्थ्यांच्या ओळखीने. अनोळखी वाटणारे व हरवलेले चेहरे पुन्हा आठवूण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटू लागले.त्यानंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चालू जीवनाबद्दल आणि पुढच्या यशस्वी वाटचाली बाबत मार्गदर्शन केले. तारु सर म्हणाले ‘वाचाल तर वाचाल, व ”आरोग्य हीच संपत्ती ‘आहे हे वालगुडे सर सांगून गेले. यानंतर खरा क्षण आला तो शब्दांनी ऋण व्यक्त करण्याचा म्हणजे विद्यार्थी मनोगताचा व जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा.या नंतर सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांमार्फत मानसन्मान आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘संगीत खुर्ची ,गाण्याच्या भेंड्या, डान्स सारखे खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट उपस्थित राहणाऱ्या सर्व शिक्षक मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानून करण्यात आला.असा हा दिवसभराचा स्नेह मेळावा कार्यक्रम आनंदात उत्साहात पार पडला ,वीस वर्षांनी एकत्र भेटणारे हे मित्र आणि मैत्रिणी सर्वजण खूप खुश होते, सर्वांचे चेहऱ्यावर हास्य होते ,असेच सर्वांनी एकत्र येत राहावे आणि आपली मैत्री जपत राहावी ,या सर्व कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन प्रवीण कोंढाळकर यांनी केलं होतं या मुळे सर्वांनी त्यांचे आभार मानले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space