पुणे जिल्हा युवा अधिकारी पदी भोरचे आदित्य बोरगे यांची सार्थ निवड.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर (पुणे) : महाराष्ट्र भरात शिवसेनेमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दुफळी पडत असताना पुणे जिल्ह्यातील भोर मध्ये शिवसेना अधिकच बळकट होऊ लागली आहे. जे जातील ते कावळे राहतील ते मावळे या प्रमाणे मातोश्री वरून पक्ष बळकट करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांवर मोठी जबाबदारी देत आहेत. हीच जबाबदारी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आदित्य प्रकाश बोरगे यांच्यावर विश्वास ठेवत पक्ष श्रेष्ठींनी त्यांना पुणे जिल्हा युवा अधिकारी पदी निवड करत मोठी जबाबदारी दिली आहे.बोरगे यांच्याकडे या आगोदर भोर तालुका समन्वयक हे पद होते. पक्षासाठीची तळमळ व काम पाहता त्यांना हे जिल्ह्याचे पद दिले असल्याचे कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे,पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने वरून सरदेसाई, आदित्य शिरोडकर यांच्या वतीने सचिन अहिर ,शिवसेना जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर,कुलदीप कोंडे, पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव अविनाश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी माझी युवासेना पुणे जिल्हा युवा अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.हा दाखवलेला विश्वास,जबाबदारी मी मोठ्या जोशाने पार पाडेल आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आदित्य बोरगे यांनी सांगितले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space