माळेगाव व तांभाड येथील कातकरी बांधवांना मिळाली वीसवर्षांनंतर हक्काची वीज.
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
नसरापूर : भोर तालुक्यातील माळेगाव व तांभाड येथील कातकरी वस्ती या ठिकाणी कातकरी समाजास जवळपास १५ ते २० वर्षांपासून विद्युत पुरवठा मिळत न्हवता. या ठिकाणी वीज मिळावी या साठी नसरापूर येथील महावितरणचे अधिकारी यांनी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केला असता सदर ठिकाणी १७ जानेवारी रोजी वीज देण्यात आली.
भोर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नसरापूर उपविभाग अंतर्गत, शाखा कार्यालय नसरापूर क्रमांक १ मधील नसरापूर येथील चेलाडी कातकरी वस्ती, माळेगाव येथील कातकरी वस्ती तसेच तांभाड येथील कातकरी वस्ती येथील कातकरी बांधवांना जवळपास वीसवर्षांपासून विद्युत पुरवठा पासून वंचित राहावे लागत होते. महाराष्ट्र शासनाच्या नवीन पी व्हीं जी टी (PVGT) या योजने अंतर्गत महावितरण कंपनी अंतर्गत ठिकाणी विद्युत पुरवठा देण्यात आला. वीज जोडणी बाबत सर्व कार्यालयीन कार्यवाही करून महावितरण नसरापूर यांनी १७ जानेवारी २०२४ रोजी मौजे नसरापूर येथील चेलाडी कातकरी वस्ती, मौजे माळेगाव येथील कातकरी वस्ती व तांभाड येथील कातकरी वस्ती येथे ग्रामपंचायत च्या नोंदीनुसार जवळपास ३८ कुटुंबांना विद्युत मिटर देण्यात आलेले असून उर्वरित संबंधित ग्रामपंचायत येथे कुटुंबांची नोंद असलेल्या बांधवांना वीज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वीज जोडणी झालेल्या कातकरी समाजातील बांधवांच्या व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
सदर योजने साठी लागणाऱ्या फॉर्म ची रक्कम कातकरी बांधवांकडून न घेता सर्व अधिकाऱ्यांनी ही रक्कम भरत सामाजिक बांधिलकी जपली तसेच या योजने अंतर्गत संबंधित लाभार्थ्यास एक रुपया देखील खर्च आला नसल्याचे कदम यांनी सांगितले.
यासाठी महावितरण नसरापूर येथील उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटोळे , कुलकर्णी , सहाय्यक अभियंता शाखा नसरापुर क्र.१, राजकुमार कदम, प्रधान तंत्रज्ञ, कैलास भोये, वरिष्ठ तंत्रज्ञ तसेच शाखा कार्यालयातील बाह्यश्रोत कर्मचारी रोहिदास राउळ, कैलास मोहिते, राजेभाऊ कुंभार, संतोष नाईलकर व कातकरी समाजातील बांधव उपस्थित होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space