किकवी येथे विठभट्टी वरील पाण्याची टाकी फुटून तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सोळा वर्षीय मुलगी गंभीर जखमी.
सारोळा : पुणे सातारा महामार्ग वरील असलेल्या किकवी (भोर) गावच्या हद्दीत सोमवार दिं. १२ रोजी दुपारी १:०० च्या सुमारास प्रसिद्ध वीट भट्टी वरील पाणी साठवण्याची टाकी फुटून तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला या अपघातात एक सोळा वर्षीय मुलगी देखील गंभीर जखमी आहे जखमी मुलीस जवळील खाजगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती घेत पुढील तपासाच्या सूचना दिल्या.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार किकवी गावामध्ये सुरू असलेल्या वीडभट्टी व्यवसायाला लागणारे पाणी साठवण्यासाठी मागील पंधरा दिवसांपूर्वीच पाण्याची टाकी बांधली गेली होती व ठिकाणी काम करणारे कामगार रोजच्या प्रमाणे पाण्याच्या टाकी यामध्ये पाणी भरत होते. त्याचवेळी ती टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली व त्यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर त्यामध्ये सोळा वर्षीय मुलीगी गंभीर रित्या जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तीव्रता एवढी होती की शेजारील असलेल्या घराची देखील भिंत कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space