पसुरे चे मनोज धुमाळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर : भाटघर धरण जलाशय भागातील पसुरे गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांना त्यांनी गावात तंटामुक्त अध्यक्ष म्हणून राबवलेले विविध लोकोपयोगी कार्यक्रम,गावातील तंटे गावातच मिटवून व तंटे होऊ नयेत यासाठी केलेल्या अनेक संकल्पना याची दखल घेत राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष-२०२४ हा राज्यस्तरीय पुरस्कार काल पुणे येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पसुरे गावचे मा.सरपंच प्रकाश देशमुख, मा.सरपंच राजेंद्र धुमाळ,विकास सोसायटी मा.चेअरमन दत्तात्रेय धुमाळ, मा.संचालक दशरथ धुमाळ,वाढेश्र्वर देवस्थानचे विश्वस्त संदीप धुमाळ,युवा उद्योजक बिपिन देशमुख,सामाजिक कार्यकर्ते अनिकेत धुमाळ यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन भगवान मंदीलकर यांचे मार्गर्शनाखाली राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,दक्ष मराठी पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य व जागृत शोध वृत्तपत्र यांनी केले होते
“या पुरस्काराने समाज कार्य आणखी जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली असून,चांगले काम केले तर नक्कीच समाज दखल घेत असतो हे या निमित्ताने अधोरेखित झाले. यापुढील काळात अध्यक्षीय पदाच्या माध्यमातून अनेक संकल्प गावात राबवण्यासाठी काम करणार आहे.”
मनोज धुमाळ
अध्यक्ष – महात्मा गांधी तंटामुक्त समिती,पसुरे
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space