राजगड कारखाना राहणार बंदच कामगारांचा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सारोळा : राजगड साखर कारखाना यंदा बंदच राहणार असल्याने दि १३ रोजी कामगारांसाठी कामकाज स्थागितीची नोटीस कारखान्याच्या गेट वर लावली आहे.
गाळप हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री दुरुस्त केली परंतु शासनाकडून थक हमी उपलब्ध न झाल्याने व कर्ज न मिळाल्याने तसेच ऊस टोळ्यानी पाठ फिरवल्याने कारखान्याची परिस्थिती व्यवस्थापनाच्या आवाक्याबाहेर गेली.परिणामी यंदा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला.
कारखान्यासाठी पैसा उभा राहू शकला नाही. ऊसतोड टोळ्यांना आगाऊ रक्कम देऊनही टोळी मालकानी फसवणूक करत कारखान्याची दिशा भुल केली या मुळे ऐनवेळी दुसऱ्या टोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत. बँकेकडून कर्ज मिळाले नाही. परिणामी संचालक मंडळाने या वर्षीच्या हंगामात कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व कामगारांना तात्पुरती कामकाज स्थगितीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
याविरुद्ध कामगारांनी थकीत पगार व थकीत बोनस एकरकमी मिळावा, थकीत भविष्य निर्वाह निधी,रिटायर कर्मचाऱ्यांची ग्रॅज्यूटी व रजेचा पगार व इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.या साठी कामगारांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची तारीख आठ दिवसात ठरवून तहसील कर्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space