अभिषेक वैराट यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद प्रतिनिधी : सागर खुडे
नसरापूर : बहुजन समाज घटकातील तरुणांना न्याय देण्याचे काम प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व सुजात भाई आंबेडकर हेच करू शकतात या विश्वासाने संभाजी ब्रिगेड भोर वेल्हा तालुका अध्यक्ष अभिषेक वैराट यांनी अनेक कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी विविध समाज घटकातील मान्यवर व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
नसरापूर येथील रेणुका मंगल कार्यालय येथे दि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी एक वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.अनेक कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये अभिषेक वैराट यांनी पक्ष प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य युवा कार्यकारणी सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी (पुणे जिल्हा अध्यक्ष) कमलेश उकिरडे तसेच विशाल गवळी (राज्य.का.सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य) सुनील जावळे (महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर) नितीन गवळी (अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर) सतिश गायकवाड (महा सचिव पुणे जिल्हा) विनोद गायकवाड (जिल्हाध्यक्ष दलित युथ पॅथर) मयुर गायकवाड (उपाध्यक्ष पुणे जिल्हा) ऋषिकेश वाघमारे, विपुल सोनावणे यांच्या उपस्थितीत गणेश ननावरे (उपसरपंच अंबवणे),सागर संपकाळ,गणेश खैरे (मा.ग्रामपंचायत सदस्य नायगाव),रमेश सोनवणे,ऋतिक शेडगे,अमर माने,मिलिंद जगताप,रूपेश जगताप,आकाश कांबळे,कुणाल कांबळे,अरुण रणखांबे,प्रकाश ओव्हाळ,शुभम तायडे,निखिल कांबळे,संजय खुडे,विशाल अडसूळे,शुभम गायकवाड,ओंकार तांबेकर,प्रसाद जाधव यांनी वंचित
बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space