लाल मातीच्या तस्करीत उपरे झाले कोट्यधीश.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर तालुक्यातील माती उत्खनन प्रश्न ऐरणीवर
शिव संवाद प्रतिनिधी : तुषार सणस
भोर : भोर वेल्ह्यातील भाटघर धरण पट्ट्यातील करंदी व पसूरे तसेच वेल्हे तालुक्यातील मार्गासनी परिसरात मोठ्या प्रमाणत उत्खनन केले जात आहे. भागातून मोठ्या संख्येने मातीची वाहतूक होत असल्याने आजू बाजूच्या गावकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
नर्सरीसाठी लागणारी लाल माती ही केवळ भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे ही लाल माती भोर तालुक्यातील मळे, भूतोंडे, माझगाव, करंदी व विविध गावांतून मागवली जाते. नाममात्र पाचशे ब्रास च्या नावावर पाच हजार ब्रास माती उत्खनन करून शेतकऱ्यांच्या हातात फक्त हजार रुपये टेकवून हायमास डंपरच्या माध्यमातून पंचवीस हजारात विकली जाते. तर चोवीस हजाराचा मलिदा हा कोणा कोणाला वाटला जातो ?
महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, आर टी ओ अधिकारी, स्थानिक गुन्हेगार व नेत्यांचा हिस्सा या सर्वांचे समाधान करणारा मोरखा, जे सी पी धारक, विविध पक्षाचे कार्यकर्ते यांचा मेळ बसवून माती तस्करी करणाऱ्याला चार ते पाच महिन्यात कोट्यवधीचा मलिदा हायमास डंपर धारकांना मिळतो एका महिन्या मध्ये पाचशे ब्रास च्या जोरावर बावीस ते पंचवीस दिवसामध्ये दिवसातून दोन फेऱ्या मारल्या जातात एका हायमास मध्ये सात ब्रास दिवसाला दोन ट्रिपा तर बावीस ते पंचवीस दिवसामध्ये हजारो ब्रास माती उत्खनन केली जाते. या उत्खननामध्ये पंधरा ते सोळा गाड्यांचा समावेश असतो प्रत्येक गाडीचे आलेख काढला तर पाच हजारा ब्रासच्या अधिक उत्खनन केले जाते उत्खननामध्ये महसूल खाते आरटीओ मर्यादेच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करूनही शांत बसवले जाते. परिसरातील वातावरण दूषित करत असल्याने स्थानिक त्याचा मलिदा खात असतात सगळ्यांना तोंड देऊन मोरख्या दिवसाला एका गाडी मागे दहा हजार कामवितो हा माणूस कोट्यवधी रुपयाची उलाढाल करून याला सगळेच पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहे. याची जिल्हा अधिकारी यांनी उत्खनन जिल्हा अधिकारी यांनी महसूल विभागाचा सखोल अभ्यास करून माती तस्करी थांबवून नैसर्गिक साधन संपत्तीचा अपर्यास टाळावा.
भोर वेल्हा तालुका पाहता अतीपर्जन्यमान डोंगरदऱ्यात नटलेला आहे. याचा अपर्यास सपाटीकरणाच्या नावा खाली उरुळी कांचन व दौंड पट्ट्यातील नर्सरी धारकांना देत आहेत हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसूनही यांच्यावर कारवाई का होत नाही ? या मध्ये स्थानिक गुन्हेगारी बळावली आहे. सोप्या पद्धतीने गुन्हे गारीला पाणी घालण्याचे काम होत आहे या मुळे याचा शोक्ष मोक्ष लावून उत्खनन व्यवसाय बंद करणे गरजेचे आहे नैसर्गिक साधन संपत्ती जपण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिक करीत आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space