हरिश्चंद्री शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन लय भारी.
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिश्चंद्री येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमासाठी शाळा परिसर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी भरून गेला होता.
या समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने झाली. त्यानंतर अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
शालेय अभ्यास आणि मिळालेले गुण यांना महत्त्व आहेच. वर्षभर त्यावरच भर दिला जातो,परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा काळ लक्षात घेता त्यांच्यातील विविध क्षमतांना वाव देण्याच्या हेतूने विविध उपक्रम शाळेत राबवले जातात.मुलांच्या अंगी असलेल्या सुप्तकलागुणांना, प्रतिभाशक्तीला वाव देण्यासाठी आणि मुक्तपणे भावना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी अशा रीतीने पहिलेच वार्षिक स्नेहसंमेलन नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पडले.या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीला अनुसरून पोवाडा, भजन, एकपात्री प्रयोग, भारुड, नाटिका, जुन्या-नवीन हिंदी गाण्यांवर आधारित रेकॉर्ड डान्स, रामायणावर आधारित गीत, राजा शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास यावर आधारित असणारी गीते यासारख्या बहारदार गीतांचा समावेश करण्यात आला होता
या कार्यक्रमाचा मुलांनी व पालकांनी भरभरून आनंद लुटला.अतिशय आनंदी वातावरणात स्नेहसंमेलन संपन्न झाले.या प्रसंगी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ, जय हनुमान तरुण मंडळ, पोलीस पाटील ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य ,महिला बचत गट, विविध विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन संचालक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ग्रामस्थ,महिला , पालक,विद्यार्थी तरुण ,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space