नमस्कार शिव संवाद न्युज मध्ये आपले सहर्ष स्वागत. येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या पाहायला मिळतील.तसेच बातम्या व जाहिराती साठी संपर्क मुख्य संपादक: तुषार दत्तात्रय सणस 9763014812 समन्वयक: मंगेश राजेंद्र पवार 9834245095. , राष्ट्रवादी पार्टी फुटीनंतर प्रथमच भोर तालुक्यात शरद पवारांची सभा –
07/03/2024

जनतेच्या मनातले परखड व निर्भिड व्यासपीठ

राष्ट्रवादी पार्टी फुटीनंतर प्रथमच भोर तालुक्यात शरद पवारांची सभा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भोर: तालुक्यातील हरिश्चंद्री येथील प्रांगणात देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार, (उ बा ठा) शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर वेल्हा तालुक्यातील शेतकरी,कार्यकर्ते व महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.या वेळी काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे,वेल्हाचे अध्यक्ष नाना राऊत ,शिवसेनेचे भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,वेल्हा अध्यक्ष दीपक दामगुदे,राष्ट्रवादी भोर तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल,वेल्हा अध्यक्ष दीपक रेणुसे,पोपटराव सुके,दिनकर धरपाळे आदित्य बोरगे, लहूनाना शेलार,शंकर भुरुक,विठ्ठल वरखडे,धनंजय वाडकर,शिवराज वाडकर,नारायण कोंडे,ज्ञानेश्वर पांगारे,निखिल डिंबळे,सुधीर खोपडे,अरविंद सोंडकर व तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले महाविकास आघाडी व लोकप्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे या मुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच सभा भोर तालुक्यात होत असल्याने तालुक्यातील शेतकरी तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते  यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन थोपटे यांनी केले आहे. तर जनता मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील व  विरोधकांना त्यांची जागा दाखवतील तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भोर विधानसभेतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचंनार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

शिवसेना भोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्र्वर शिंदे म्हणाले घरा मध्ये वाद घालण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे.मतदार सुज्ञ आहेत ते योग्य तो निर्णय घेतील तर लोकसभेला शिवसेना आघाडी सोबत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.तर तिन्ही पक्ष सोबत असल्याने मोठ्या मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी भोर तालुका अध्यक्ष रवींद्र बांदल म्हणाले भोर तालुक्यातील नेते गेले आहेत परंतु कार्यकर्ते अजूनही आहे तिथेच आहेत,आम्ही प्रत्येक गावात जाऊन सर्वे केला आहे या वेळी चौपट मताधिक्याने सुप्रिया सुळेच निवडून येणार असल्याचा विश्वास सर्व सामान्य जनते मध्ये आहे.भोर वेल्हा मुळशीतील लोकसभेचे सर्व काम संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले ९ मार्च रोजी सायंकाळी ४ :०० वाजता हरिश्चंद्री येथील प्रांगणात शेतकरी व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तरुण जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन भोर तालुका महाविकास आघाडीने या वेळी केले.


राष्ट्रवादी फुटिनंतर शरद पवार पहिल्यांदाच भोर तालुक्यात सभा घेणार आहेत होणाऱ्या सभे मध्ये प्रमुख नेते काय भाष्य करणार आहेत ? तसेच महविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल?
तर महाविकास आघाडीचा प्रचार कशा स्वरूपात असणार आहे ? असे अनेक प्रश्न कार्यकर्ते व मतदारांना पडलेले आहेत तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने या सभे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

error: Content is protected !!