दिनेश धुमाळ आदर्श कराटे प्रशिक्षण पुरस्काराने सन्मानित…
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद टीम : दिपक पारठे
भोर: तालुक्यातील मौजे पिसावरे गावातील रॉयल कराटे स्पोर्ट्स मार्शल आर्ट अकॅडमी महाराष्ट्र भोर या संस्थेचे संस्थापक श्री दिनेश सुरेश धुमाळ यांना पोलीस टाईम्स लाईव्ह न्यूज नेटवर्क व युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे डो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श कराटे प्रशिक्षण पुरस्कार 2024 या पुरस्काराने सांगली माधवनगर येथे गौरवण्यात आले.
पोलिस टाईम्स लाईव्ह न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक USKA अध्यक्ष आणि तांत्रिक संचालक यांच्या हस्ते हा आदर्श कराटे प्रशिक्षण पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याने भोर तालुक्यातून दिनेश धुमाळ यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी अँड.वैशाली भानुप्रताप,पोलीस निरीक्षण विश्वजित आर,आधार फाऊंडेशन संस्थापक सागर शेलार,आर्मी ऑफिसर नैना रेड्डी यांसह अनेक कराटे मास्टर उपस्थित होते
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space