उत्रौली मध्ये फाडला सुप्रिया सुळेंचा तुतारी चिन्ह असलेला बॅनर.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद महाराष्ट्र न्युज
भोर : तालुक्यातील उत्रौली येथे सुप्रिया सुळे यांचा तुतारी चिन्ह असलेला फ्लेक्स अज्ञाताकडून ब्लेडने फाडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.हा प्रकार उत्रौली गावातील मुख्य चौकात झाला असून महत्वाचे म्हणजे आज त्याच ठिकाणी सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी खासदारकीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर ब्लेडने फुल्ली मारून हा फ्लेक्स अज्ञाताकडून फाडला आहे.सदरील घटना उघडकीस येताच हा फ्लेक्स तत्काळ काढण्यात आला असून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट नाराज झाला आहे.बारामती लोकसभा मतदार संघात सध्या सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार नणंद भाउजय अशी लढत होण्याचे चिन्ह आहेत.लोकसभा निवडणुका, आचारसंहिता जाहीर होण्या आगोदरच राजकीय वातावरण ढवळण्यास सुरुवात झाली असल्याने भविष्यात मोठे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space