साहेब मला माफ करा… वसंत मोरेचा मनसे पक्षाला जय महाराष्ट्र.
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
पुणे : वसंत मोरेनी राजीनाम्याचे कारण काय दिले वाचा पुढे….
प्रति,
मा. श्री राजसाहेब ठाकरे,
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.
आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..। पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो.
परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती. धन्यवाद..!
आपल्य विश्वासू,
वसंत (तात्या) मोरे
कात्रज पुणे
असा लेखी राजीनामा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वसंत मोरेची पुढे भूमिका काय असणार आहे या कडे सर्वांचे लक्ष आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space