गवत जळतग्रस्त ठिकाणी ध्रुव प्रतिष्ठान ची मदत..
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद प्रतिनिधी – दिपक पारठे
भोर: तालुक्यातील मौजे पसुरे येथे काही दिवसापूर्वी तानाजी शिवाजी धुमाळ या शेतकरी बांधवाच्या गवत व पेंढ्याच्या ४ गंजी अज्ञाताने पेटवून दिल्या असता सर्व गवत जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न जळीतग्रस्त शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता. गावातील व शेजार्यापाजाऱ्यांनी तात्पुरता स्वरूपात पेंढा उपलब्ध करून दिला होता पण गोठ्यामध्ये अख्खा उन्हाळा आणि पावसाळा जनावरांना खाण्यासाठी चारा कुठून आनायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. पसुरे येथील तंटामुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ यांच्या माध्यमातून राजीव केळकर यांना ही माहिती मिळताच वस्तुस्थिती लक्षात घेऊन.तानाजी शिवाजी धुमाळ यांना भोलावडे येथील शेतकरी नाना जगदाळे यांच्या शेतातील तब्बल २०० पेंढ्यांची गंज व १०० कडबा पेंढ्या उपलब्ध करून दिल्या.
आतापर्यंत अनेक ठिकाणी ध्रुव प्रतिष्ठान आपत्ती संकट समयी धावून आलेले आहे.यामध्ये रिस्क्यू साहित्य मदत, पूरग्रस्त ठिकाणी विविध प्रकारची मदत, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली झाड दूर करणे असो, घर,गवत, जळीतग्रस्त ठिकाणी तातडीची मदत संस्था करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले
या वेळी ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक -अध्यक्ष .राजीव केळकर राहुलजी खोपडे पसुरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ प्रगतशील शेतकरी बापू दगडू धुमाळ, शंकर पर्वती धुमाळ, तानाजी शिवाजी धुमाळ,नाना जगदाळे उपस्थित होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space