पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला १५ हजार मानधन
1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद संपादक : तुषार सणस
मुंबई : पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील.अशी मान्यता सदरील बैठकीत दिली आहे.
सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदा-यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे असून मानधनात वाढ केल्यास ३९४ कोटी ९९ लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल, या खर्चासही बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तरी असा अधिकृत मान्यता येण्याची वाट सर्व पोलीस पाटील करीत आहे.तरी पोलीस पाटलांच्या लढ्याला प्राथमिक यश मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space