राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्याने,तुतारी वादकांना सुगीचे दिवस.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद उपसंपादक विलास बांदल
राजगड (वेल्हे) : दि. १६ राज्यात शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उभी फूट पडली. व त्या पक्षाची दोन शकले झाली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हासह अजित पवार यांना मिळाला. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरे नाव देतानाच काही दिवसांपूर्वीच तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह मिळाले. पक्ष विस्ताराचे दृष्टीने मोठा गाजावाजा करून हे चिन्ह किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून. पक्षाने ते लोकांपर्यंत पहोचविण्यासाठी प्रयत्न केला. त्याला सर्वत्र यश येताना दिसत असताना सर्वत्र तुतारी वाजत असतानाचे चित्र असून यास भोर, राजगड (वेल्हे) तालुकाही अपवाद नाही.
या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना याचा सर्वाधिक लाभ गाव खेड्यांमध्ये तुतारी वाजवणाऱ्या लोकांना होत असून त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गावागावांमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांना तुतारी वाजवणाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे. यातून त्यांना चांगले मानधन मिळत असल्याचे पाहायला मिळत असून तुतारी वाजविणारा एक व्यक्ती एक ते दोन हजार रुपये एका कार्यक्रमाचे घेत आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग राज्यात सर्वत्र असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चिन्ह पोहचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छोट्या मोठ्या कार्यक्रमांना तुतारी वाजविणाऱ्यांना निमंत्रित करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
शिवकालापासून तुतारी या वाद्याला खूप महत्व प्राप्त झाले विजयाचे स्वागत तुतारी वाजऊन केले जायचे. अनेक पिढ्या ही कला जिवंत राहिली मात्र आधुनिक युगात ती लोप पावत चालतानाच डिजे संस्कृती उदयास आली. मध्यंतरी डीजे बंदी झाली तेव्हा वाजंत्री ताफ्याबरोबर ही तुतारी वाजू लागली मात्र पुन्हा एकदा डिजेने डोके वर काढले आणि या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असताना राज्यातील या राजकीय घडामोडींनी या कलेला पुन्हा एकदा गत वैभव प्राप्त झाले आहे.
राजकीय घडामोडी काय झाल्या कशा झाल्या याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर कोणताही फरक पडत नाही. आमची ही वाजंत्री कला लोप पावत असताना. या राजकीय घडामोडीमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हामुळे आम्हाला १००% रोजगार निर्माण झाला आहे. मतदारांना सांगावे लागत नाही चिन्ह कोणते आणि मतदान करायचे कोणाला ते त्यांना सर्व आवगत असते असे अनेक कलाकार सांगतात.
बाळासाहेब आल्हट (वाजंत्री पथक सदस्य गुंजवणे)
राजकीय गणित सर्वत्र काय चालू आहेत याच्याशी तसा आमचा फारसा संबंध येत नाही. हातावर पोट असलेला हा आमचा व्यवसाय जेव्हा कधी वाजंत्री म्हणून बोलावले जाईल तेव्हा चार पैसे हाताला मिळतात. प्रामुख्याने लग्नसराईमध्ये आम्हाला मागणी असते परंतु या राजकीय घडामोडींमध्ये लागलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यामुळे आमच्या व्यवसायात वाढ झाली आहे .
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space