किकवी सर्कल हद्दीत अवैध मुरूम उत्तखननाचा सपाटा.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
परवान्याच्या तिप्पट केले जात आहे उत्तखणन
सारोळा : भोर तालुक्यातील किकवी सर्कल हद्दीत खासगी जागेमध्ये कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणात अवैध रित्या उत्खनन सुरू आहे.महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार गेली अनेक महिने झाले सुरू असून देखील संबंधित महसूल विभागाचे सर्कल व तलाठी कर्मचाऱ्यांचे या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भोर तालुक्यातील खाजगी जागेत अवैध उत्खनन केले जात आहे.एका जागेवरून दुसऱ्या जागेवर अवैध मुरूम वाहतूक केला जात आहे.या मुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असल्याने.सध्या तालुक्यातील विविध भागामध्ये बाहेरील व्यक्ती डोंगर माळची व हायवे लगतची जागा कमी किमतीत विकत घेऊन त्या ठिकाणी अवैध रित्या उत्खनन करून मुरूमाची मोठी रक्कम मिळवत त्याच ठिकाणी प्लॉटिंग करून मोठा मलिदा मिळविला जात आहे.धांगवडी, किकवी,सारोळा,पांडे, सावरदरे,तसेच किकवी सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावा मध्ये हा प्रकार सुरू आहे.या मुळे अवैध उत्खनन,अवैध मुरूम वाहतूक,इतर प्रकारचे गुन्हे वाढत आहे.एक ब्रासचा परवाना काढून दहा ब्रास मुरूम लंपास करत महसूल विभागाला आंधारत ठेवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने संबंधित महसूल विभागाने या प्रकाराकडे लक्ष देत संबंधित जागेवर, मालकावर कायदेशीर कारवाई करावी अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.कारवाई होणार का असे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space