नमस्कार शिव संवाद न्युज मध्ये आपले सहर्ष स्वागत. येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या पाहायला मिळतील.तसेच बातम्या व जाहिराती साठी संपर्क मुख्य संपादक: तुषार दत्तात्रय सणस 9763014812 समन्वयक: मंगेश राजेंद्र पवार 9834245095. , प्राथमिक शाळेतील शिक्षकावर मुलींशी गैरवर्तन केल्या बद्दल राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल –
23/03/2024

जनतेच्या मनातले परखड व निर्भिड व्यासपीठ

प्राथमिक शाळेतील शिक्षकावर मुलींशी गैरवर्तन केल्या बद्दल राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

1 min read
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नसरापूर : भोर तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींचा विनयभंग केल्याचा गुन्हा तब्बल पंधरा दिवसानंतर राजगड पोलीस स्टेशन कामथडी येथे दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या वेळी शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेवकांनी मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श या बाबत माहिती दिली.त्यानंतर शिक्षक आपल्याला वाईट स्पर्श करत असल्याची जाणीव मुलींना झाली.या बाबत मुलींनी आप-आपल्या पालकांना माहिती दिली.असता पालकांनी सदर शिक्षकास जाब विचारत सामूहिक चोप दिला.हा प्रकार पाच मार्च रोजी उघडकीस आला असून पालकांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे या बाबत तक्रार केली.या वर गटविकास अधिकाऱ्यांनी महिला समिती नेमत झालेल्या प्रकाराची शाहनिशा करून प्रवीण बोबडे या  शिक्षकास निलंबित केले आहे.


याबाबत राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून सदर प्रकरणाची माहिती घेत या गंभीर गुन्ह्याची तक्रार बलिकांचे लैंगिक शोषण ( पोस्को) कायद्या अंतर्गत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत  उपपोलीस निरीक्षक किकवी अजित पाटील पुढील तपास करीत आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे चांगला व वाईट स्पर्श या बाबत समुपदेशन गरजेचे असून.अजूनही विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श काय असतो हे पूर्ण पने माहीत नाही.या बाबत पंचायत समिती शिक्षण विभागाने तसेच प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने समुपदेशनाचे कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

error: Content is protected !!