प्रहारचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहितेना अटक : खंडणी व अपहरण केल्याचा आरोप.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर : तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांना अटक झाल्याने भोर व खंडाळा तालुक्यात चर्चेला उधाण आले असून. मोहिते यांच्या सोबतच जयश्री गोरक्ष थिटे यांच्यावर खंडणी व अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र लक्ष्मण पालखे , रा. हातवे बु।।, ता. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रहार जनशक्ती भोरचे अध्यक्ष संतोष मोहीते यांनी राजेंद्र पालखे यांच्या मुलाला ‘तु अवैध प्रवासी वाहतूक करतो’. प्रवासी वाहतूकीची गाडी चालवायची असेल, तर तुला मला पैसे द्यावे लागतील असे म्हणून पालखे यांच्या मुलाकडे पैशासाठी तगादा लावून त्याच्याकडून दहा हजार रूपये खंडणी घेतली.तसेच राजेंद्र पालखे यांच्या गावातील बचत गटाच्या महिला थिटे यांच्या सांगण्यावरून कृषांत पालखे मोहिते यांच्या किकवी येथील ऑफिसला गेले असता त्या दोघांनी कृषांत याला धमकावले. संतोष मोहिते यांनी बचत गटाच्या व्यवहारापोटी तडजोड करतो, असे सांगून त्यासाठी पैशाची मागणी पालखेंकडे केली. त्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने कृषांत राजेंद्र पालखे (वय 30 वर्षे) यास पैशासाठी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे अपहरण केले असल्याची फिर्याद राजगड पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
शनिवार दि 6 रोजी पोलीसांनी मोहिते यांना भोर न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे.याबाबत माझा खंडणी व अपहरण या मध्ये कसलाही संबंध नाही तसेच मला या गुन्ह्या मध्ये अडवण्याचे मोठे षडयंत्र असल्याचे मोहिते सांगत आहे.तर या प्रकरणामध्ये राजगड पोलिसांसमोर कृषांत राजेंद्र पालखे यांचा शोध घेणे मोठे आव्हान ठरणार आहे.या बाबत पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space