भोरमध्ये हिंदू खाटीक समाजाच्या महिलांनी लुटला संक्रांतीचा आनंद
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर :शहरात भोर तालुका हिंदू खाटीक समाजाकडून समाजातील महिलांसाठी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून हळदीकुंकू समारंभ व तिळगूळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभागी होत कार्यक्रम यशस्वी करत संक्रांतीचा आनंद लुटला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्तीवर प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
या कार्यक्रम दरम्यान देवाला ओवसा वाहून तसेच एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण व तिळगुळ देत आनंदात संक्रांत साजरी केली. यावेळी समाजातून जवळपास १७० महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन शलाका कांबळे, कोमल गायकवाड, प्राची पलंगे, अमृता गायकवाड तसेच भोर तालुका हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष विनय पलंगे, सचिव धिरज पलंगे, पदाधिकारी निखिल घोणे, सिद्धार्थ थोरात, योगीराज कांबळे, कार्यकर्ते सौरभ गायकवाड, प्रतीक गायकवाड, योगेश घोलप, शिवम पलंगे यांनी केले. महिलांसाठी अशाच विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन स्त्रीशक्तीचा जागर करत, महिला सबलीकरणासाठी विषय प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष विनय पलंगे यांनी सांगितले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space