बनवडी कराड मध्ये आनंद अनुभूती शिबिराचा समारोप.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कराड : तालुक्यातील ग्रामपंचायत इमारत बनवडी ता.कराड जिल्हा सातारा येथे श्री श्री रविशंकर ( गुरुदेव ) यांच्या आशीर्वादाने आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन दि.२ मार्च ते ६ मार्च रोजी करण्यात आले होते.शिबिराचे प्रशिक्षक संदेश सर , श्रीकांत सर ,सोनाली मॅडम, यज्ञेश सर होते. या शिबिरामध्ये सहभागी होत प्रशिक्षणार्थ्यांनी योगा,प्राणायाम,ध्यान तसेच श्वासावर नियंत्रण करण्याची टेक्निक सुदर्शन क्रिया आत्मसात केली.
या शिबिरामध्ये ताण तणाव कमी होणे,शरीर,रोग प्रतिकारक क्षमतेत वाढ,आध्यात्मिक स्तरावर आंतरिक शक्तीचा अनुभव,चिंता – भय या पासून मुक्तता,मानसिक स्तरावरील,प्रभावी निर्णय क्षमता,मनाची एकाग्रता,आत्मविश्वास वाढ, भावणावर नियंत्रण या सारख्या विषयावर मार्गदर्शन तसेच श्वासाचे महत्व या बद्दल
सर्व माहीत देण्यात आली.शिबिरामध्ये स्वतःतील बदल सांगते वेळी सर्व भावनिक झाले होते तर मिळालेला आनंद इतरांनाही देण्यासाठी त्यांना या प्रवाहामध्ये घेऊन येण्याचा संकल्प सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला. तर दररोज न चुकता शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकसित होण्यासाठी योगा प्राणायाम सुदर्षणक्रिया करणार असल्याचं निर्धार उपस्थितांनी केला.
तसेच सर्व प्रशिक्षकांनी होळी स्पेशल आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आयोजित २४ मार्च ते ३० मार्च युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम ७ दिवसीय शिबीराचा आनंद घेण्याची विनंती सर्वांना केली.तर या शिबिराचे आयोजन कीर्ती दीदी, सुवर्णा दीदी, वैष्णवी दीदी, शितल दीदी ,ओंकार दादा, विहार दादा , कृष्णात पवार या सर्व युवाचार्य यांनी केले होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space