भोर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी आत्मनिर्भर योजना राबविली जाणार
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भोर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोर व बांबू एन्व्हायरमेंट अँड टुरिझम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी (महिला बचत गटांना प्राधान्य) बांबूच्या स्थानिक प्रजातींना प्रोत्साहन देण्यासाठी शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी आत्मनिर्भर योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यपद्धती अशी राहील.
भोर तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांची निवड केली जाईल..
प्रथम मागणीत प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड होईल.
रोपवाटिका मागणी केलेल्या अर्जदाराने विविध नमुन्यात अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करणे तसेच सोबत सातबारा उतारा जोडणे अनिवार्य आहे
प्रत्येक अर्जदाराला शंभर रोप निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
तालुक्यात १०० शेतकरी प्रत्येकी १०० रोपे याप्रमाणे तालुक्याला दहा हजार रोप निर्मितीचे एकूण उद्दिष्ट आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना तालुकास्तरावर शासकीय पद्धतीने रोपवाटिका करण्याचे एक दिवशीय प्रशिक्षण दिले जाईल.
प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी आवश्यक प्लास्टिक पिशवी, खते, औषधे, कोकोपीट याचे किट दिले जाईल,सदर रोपवाटिका ही शेतकऱ्यांनी आपल्या घराजवळ गोठ्यामध्ये, परड्यामध्ये, किंवा तात्पुरता निवारा उभा करून करावयाची आहे.
रोपवाटीका शाखीय पद्धतीने मेस, माणगा, व इतर स्थानिक प्रजातीची करणे बंधनकारक आहे.
रोपवाटिकेचा प्रगती अहवाल प्रत्येक आठवड्यात फोटोसह देणे बंधनकारक आहे.
रोप वाटिकेसाठी कोणतेही रोख अनुदान दिले जाणार नाही परंतु यशस्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर प्रशस्तीपत्रक गौरव चिन्ह व रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे.
तरी लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना आपली नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी संतोष दिघे संपर्क क्रमांक 9325081635 व सुवर्णा सुकाळे संपर्क क्रमांक 9223277360 यांच्याशी संपर्क साधावा.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space