श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकू समारंभ
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिव संवाद महाराष्ट्र न्युज नेटवर्क : दीपक पारठे
भोर : तालुक्यातील मौजे करंजगाव येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर (खेळ रंगला पैठणीचा) व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन नवनिर्वाचित सरपंच विद्या प्रदीप मांढरे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांकाच्या मानकरी निर्मला शिवतरे ठरल्या यांना कुलर आणि पैठणी देण्यात आली.तर द्वितीय क्रमांक छाया मळेकर यांना टॉवर फॅन व पैठणी तसेच तृतीय क्रमांक सुवर्णा परखांदे यांनी पटकावला त्यांना देखील इस्त्री व पैठणी देण्यात आली.
या तीन बरोबरच लकी ड्रॉ मध्ये दोन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये खोपडे व गायकवाड या महिलांना पैठणी देण्यात आली
या कार्यक्रमा प्रसंगी राजगड ज्ञानपीठ च्या मानद सचिव स्वरूपा ताई थोपटे,गीतांजली शेटे, सुवर्णाताई मळेकर,मंदाताई जाधव,निर्मलाताई आवारे, संपत मळेकर,यांच्यासह विद्यमान सरपंच विद्याताई मांढरे,ग्रामपंचायत सदस्या चंद्रभागा मळेकर, ग्रा.पं.सदस्या निलम मळेकर,ग्रा.पं.सदस्या प्रमिला गायकवाड,लक्ष्मी मळेकर,रंजना मळेकर,सुरेखा मळेकर,कल्पना मळेकर,पौर्णिमा मळेकर, जया मळेकर रंजना मांढरे,ऐश्वर्या मांढरे,पल्लवी मळेकर, माया मळेकर,संगीता कुमकर यांच्यासह होम मिनिस्टर समालोचक किरण शिळीमकर तसेच ग्रामस्थ,महीला वर्ग व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मळेकर यांनी केले व आभार विद्यमान सरपंच विद्या प्रदीप मांढरे यांनी मानले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space